दि.२१ के. के. वाघ विद्याभवन भाऊसाहेबनगर ता. निफाड येथे 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' -२०२० एक दिवशीय कार्यशाळा आयोजित केली. या प्रसंगी कार्यशाळेचे उदघाटक श्रीमती शकुंतलाताई वाघ, विश्वस्त, अध्यक्षस्थानी प्राचार्य,अशोक बस्ते, कार्यशाळेसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक प्राचार्य डॉ. पुंडलिक रसाळ, प्रा. डॉ. अशोक बोडके यांनी येऊ घातलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) या बाबत सखोल माहिती व शिक्षकांची भूमिका, आकृतीबंध, समाविष्ट विषय, फायदे अपेक्षित बदल याचे मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती शिवाजी नाठे, अध्यक्ष, स्कुल कमिटी, मुख्याध्यापिका उज्ज्वला तासकर, मुख्याध्यापिका, संगीता नाईक, प्राचार्य बाळासाहेब मोंढे तसेच भाऊसाहेबनगर व पिंपळस रामाचे येथील तीनही शाळांचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. यशवंत ढगे, सूत्रसंचालन संजय धनगर तर आभार गणपत मोरे यांनी मानले.
|
२५ डिसेंबर रोजी के. के. वाघ शिक्षण संस्था, स्माईल व स्पिनॅच संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या स्मरणार्थ ११ व्या क का वाघ स्मृती चषक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धांचे उदघाटन भाऊसाहेबनगर येथे मोठ्या उत्साहात झाले.
दि.बुधवार दिनांक २५ डिसेंबर ते २५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या स्पर्धांमध्ये फुटबॉल, कुस्ती, बुद्धिबळ, स्क्वॅश व रस्सीखेच या जिल्हास्तरीय खुल्या क्रीडा स्पर्धा तसेच क्रिकेट,खो खो, कबड्डी व व्हॉलीबॉल या निफाड, सिन्नर, दिंडोरी, चांदवड व येवला आदी तालुके मर्यादित खुल्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा के के वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शकुंतलाताई वाघ,तर प्रमुख अतिथी जनसंपर्क प्रमुख अजिंक्यदादा वाघ,माजी जि.प.सदस्य सिध्दार्थ वनारसे,प्राचार्य अशोक बस्ते, मा.प्राचार्य रविंद्र मोरे,श्री.डी के जगताप, रामनाथ पानगव्हाणे,बबन शिंदे,श्रीकांत ढवळे,उज्वला तास्कर,संगीता जगताप,तानाजी पुरकर,गोरख जाधव,डॉ राहुल घायाळ,त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच,चेअरमन व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींनी क्रीडा स्पर्धांचे महत्त्व सांगत सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक यशवंत ढगे तर प्रास्ताविक विद्याभवनाचे प्राचार्य अशोक बस्ते यांनी केले.जास्तीत जास्त खेळाडूंनी कर्मवीर चषक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन स्माईल व स्पिनॅच सेवाभावी संस्थेचे सचिव अजिंक्यदादा वाघ यांनी करत कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील क्षीरसागर,सारंग नाईक,सुनील निरगुडे,क्रीडाविभागप्रमुख गोविंद कांदळकर,क्रीडाशिक्षक डी के मोरे,सागर डोखळे,समीर शेख यांनी अथक परिश्रम घेतले.
|
२८ डिसेंबर ५२ वे निफाड तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात के.के.विद्याभवन ,भाऊसाहेबनगर ला घवघवीत यश:*
*स्वप्निल प्रकाश जाधव - प्रयोगशाळा सहाय्यक शैक्षणिक साहित्य तृतीय क्रमांक*
*शारदा बाळासाहेब मोरे- माध्यमिक गट शैक्षणिक साहित्य प्रथम क्रमांक*
सर्व सहभागी विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व विज्ञान शिक्षक श्री गंगावणे सर ,श्रीमती दिवे मॅडम,श्रीमती आंबेकर मॅडम,श्री तोरवणे सर,श्रीमती कदम मॅडम, श्रीमती शेळके मॅडम या सर्वांचे विद्याभवन परिवाराकडून हार्दिक अभिनंदन!!*बक्षीसपात्र श्रीमती शारदा मोरे मॅडम व श्री स्वप्निल सर यांचे विशेष अभिनंदन*
|