< Hurry Up For Admission! Admissions are Open for June 2021... < For online admission Google Form click here

शालेय बातमी पञ मागोवा जानेवारी २०२५

१३ जानेवारी २०२५ बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नाशिक क्षेत्रभेट

के के वाघ विद्याभवन भाऊसाहेब नगर येथे बी.आय.एस क्लब स्थापन करण्यात आलेला आहे. या क्लब अंतर्गत १३ जानेवारी २०२५ रोजी विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट आयोजित केले होती. बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नाशिक येथे एकूण 34 विद्यार्थी या क्षेत्रभेटीसाठी नेण्यात आले होते. या विद्यार्थ्यांनी बजाज इलेक्ट्रिकल्स येथे तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक बल्ब, वॉटर हीटर, मिक्सर ग्राइंडर, हँड ब्लेंडर या वस्तूचे उत्पादन कसे होते व याचा दर्जा कसा राखला जातो यासंबंधी सर्व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

२२ जानेवारी २०२५ बेटी पढावो बेटी बचावो रॅली

२२ जानेवारी २०२५ कर्मवीर काकासाहेब वाघ विद्याभवन भाऊसाहेब नगर च्या विद्यार्थी, शिक्षकांनी भाऊसाहेब नगर परिसरात "बेटी बचाओ , बेटी पढाओ,जनजागृती रॅली" काढली. प्राचार्य अशोक बस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेबनगर येथील परिसरात विद्यार्थ्यांनी "मुलांपेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी''बेटी बचाओ,बेटी पढाओ" या घोष वाक्यांनी जनजागृती केली. या रॅलीत प्राचार्य अशोक बस्ते, उपप्राचार्य दिवाकर शेजवळ, पर्यवेक्षिका सुनीता वडघुले, पंचक्रोशीतील नामवंत डॉ.राहुल घायाळ, डॉ.शरद आहेर,पत्रकार नानाभाऊ पवार, आदींसह विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२४ जानेवारी २०२५ स्काऊट आनंदमेळा

२४ जानेवारी २०२५ रोजी स्काऊट आनंदमेळा विद्याभवनाचा स्काऊट आनंद मेळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. हा आनंद मेळा यशस्वी करण्यासाठी आपल्या विद्याभवनचे प्राचार्य आदरणीय श्री अशोक बस्ते सर. समन्वयक, श्री. यशवंत ढगे सर, श्री. शेजवळ सर, श्रीमती पाटील मॅडम, श्री. कांदळकर सर, श्री.धनंजय मोरे सर, सर्व स्काऊट मास्टर्स, सर्व वर्गशिक्षक, ज्येष्ठ शिक्षक श्री आर. डी. गांगुर्डे सर, श्री.गंगावणे सर, श्री.उगले सर, सूत्रसंचालन करणारे श्री. धनगर सर, फलक लेखन करणारे श्री.चव्हाण सर, श्री. यशवंत गांगुर्डे सर, स्टॉल परीक्षक श्रीमती सोनार मॅडम, रत्नपारखी मॅडम, मोरे मॅडम, साळी मॅडम, त्याचप्रमाणे उद्घाटनाच्या स्टॉलची तयारी करणाऱ्या श्रीमती गायत्री वाघमारे मॅडम, प्रतीक्षा शेळके मॅडम,किरण कदम मॅडम,पूजा बोंबले मॅडम, सर्वच शिक्षक बंधू भगिनी, त्याचप्रमाणे सुनील मामा, नागरे मामा सर्वांनीच अतिशय मोलाचे सहकार्य केले व आनंद मेळा यशस्वी केला.

२६ जानेवारी २०२५ भारतीय प्रजासत्ताक दिन

२६ जानेवारी २०२५ के के वाघ विद्याभवन व ज्युनिअर कॉलेज भाऊसाहेबनगर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला.एन. सी. सी. स्काऊट, हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी लाजवाब संचलन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्याभवनचे प्राचार्य अशोक बस्ते तर प्रमुख अतिथी के के वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शकुंतलाताई वाघ, स्कूल कमिटीचे अध्यक्ष प्रा. शिवाजी नाठे, समन्वयक यशवंत ढगे, निफाड तालुक्याचे वनपाल, एन. एन. गांगोर्डे, मुख्याध्यापिका उज्वला तासकर, प्राचार्य बाळासाहेब मोंढे, अधीक्षक श्रीकांत ढवळे, उपमुख्याध्याप दिवाकर शेजवळ, पर्यवेक्षिका सुनिता वडघुले, बस्तीराम रानडे, गणेश टर्ले, उपस्थित होते. प्रसंगी विश्वस्त शकुंतलाताई वाघ यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभ संदेश दिला. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अशोक बस्ते यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिन आपण का साजरा करतो? त्याचे महत्त्व काय? हे सविस्तर विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत ढगे यांनी केले.सूत्रसंचालन संजय धनगर यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप खिस्ते यांनी मानले.

२९ जानेवारी २०२५ इंग्लिश क्लब

२९ जानेवारी २०२५ के के वाघ विद्याभवन व ज्युनिअर कॉलेज भाऊसाहेबनगर येथे इंग्लिश क्लब च्या माध्यमातून दिनांक 23 ते 28 डिसेंबर 2024 दरम्यान इंग्लिश वीक साजरा करण्यात आला. यामध्ये सुंदर हस्ताक्षर, वक्तृत्व, लेट्स टॉक, मेमरी गेम, होमोफोन्स अशा विविध स्पर्धा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ रेडिओ सिटी चे आरजे टकाटक प्रथम यांच्या प्रमुख उपस्थितीत 29 जानेवारी 2025 रोजी पार पडला. या प्रसंगी प्राचार्य अशोक बस्ते, समन्वयक यशवंत ढगे, उपमुख्याध्यापक दिवाकर शेजवळ उपस्थित होते. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून वाचनासाठी इंग्रजी पुस्तके देण्यात आली. टकाटक प्रथम यांनी कार्टून पात्रांचे आवाज काढत विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले आणि रेडिओ क्षेत्रातील करिअर विषयी माहिती सांगितली.