स्पर्धेच्या युगात खेळाडूंनी स्वतःला टिकून ठेवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार दिलीप काका बनकर यांनी केले ते के. के. वाघ शिक्षण संस्था,स्माईल व स्पिनॅच यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या स्मरणार्थ ११ व्या क. का. वाघ भाऊसाहेब नगर ता निफाड येथील स्मृती चषक स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी के. के.वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त श्रीम शकुंतलाताई वाघ तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून,निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव, पिंपरी सरपंच शिलाताई जाधव,अधीक्षक श्रीकांत ढवळे, गोरख जाधव, तानाजी पुरकर, गोकुळ झाल्टे,कारभारी मत्सागर, शिवाजी घोलप, रामनाथ आहेर, डॉ.राहुल घायाळ, भैया गोसावी,दौलत कडलग, गाबजी मत्सागर, शिवाजी नाठे मुख्याध्यापक अशोक बस्ते, मुख्याध्यापिका संगीता नाईक,प्राचार्य बाळासाहेब मोंढे,प्राचार्य शरद कदम, प्राचार्य किरण वाघ, उपमुख्याध्यापक दिवाकर शेजवळ, पर्यवेक्षिका सुनीता वडघुले उपस्थित होते यावेळी आमदार बनकर यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करत भविष्यात खेळात उत्तम करिअर असल्याचे प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षा शकुंतलाताई यांनी खेळाडूंनी खेळात करिअर करा असे सांगितले.तर प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी खेळाडूंना व्यसणापासून दूर रहा ,मोबाईलचा वापर कमी करा, खेळाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करा,असे प्रतिपादन केले आभार संस्थेचे जनसंपर्क प्रमुख अजिंक्य वाघ यांनी मानले, सूत्रसंचालन यशवंत ढगे यांनी केले. स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी सुनील क्षीरसागर, सारंग नाईक, सुनील निरगुडे, क्रीडाविभाग प्रमुख गोविंद कांदळकर,डी के मोरे,सागर डोखळे,बंडू कोल्हे,समीर शेख,आकाश आहिरे,दीपक कुंभार,यांनी प्रयत्न केले.
|