के. के. वाघ विद्याभवन भाऊसाहेबनगर ता.निफाड येथे १६ जुन २०२५ प्रवेश उत्सव रोजी साजरा करण्यात आला, याप्रसंगी विद्यार्थ्याचे ओवाळून गुलाब पुष्प व मिठाई वाटून तसेच पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी मा. प्राचार्य दिवाकर शेजवळ, माजी. प्राचार्य यशवंत ढगे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
|
के के वाघ विद्याभवन भाऊसाहेबनगर ता निफाड येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा झाला प्राचार्य दिवाकर शेजवळ यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा विभाग प्रमुख गोविंद कांदळकर यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखवत एन.सी. सी,स्काऊट,हरितसेना या विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली.तसेच पर्यवेक्षिका सुनीता वडघुले यांच्या सह शिक्षक ,शिक्षिका यांनी ही योगासने केली. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य दिवाकर शेजवळ यांनी विद्यार्थ्यांना योगाचे जनक महर्षी पतंजली यांची माहिती व योगाचे फायदे सांगत योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या
|