६ फेब्रुवारी २०२५ कै.बाळासाहेब (भाऊ)देवराम वाघ तृतीय पुण्यतिथी
|
|
|
|
|
६ फेब्रुवारी २०२५ के.के.वाघ शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष आदरणीय कै.बाळासाहेब (भाऊ)देवराम वाघ यांना तृतीय पुण्यतिथी निमित्ताने भावपूर्ण आदरांजली
|
१७ फेब्रुवारी २०२५ इयत्ता १० चा निरोप समारंभ
|
|
|
१७ फेब्रुवारी २०२५ के के वाघ विद्याभवन भाऊसाहेब नगर येथे इयत्ता १० चा निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्याभवनाचे प्राचार्य यशवंत ढगे तर प्रमुख अतिथी कवी राजेंद्रजी सोमवंशी (निफाड), माजी प्राचार्य अशोक बस्ते समवेत उपप्राचार्य दिवाकर शेजवळ विद्यार्थी प्रतिनिधी मयूर कदम व्यासपीठावर उपस्थित होते. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत ढगे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेछा दिल्यात तर निरोप समारंभ म्हणजे दुःखाचा प्रसंग नसून तो पुढील वाटचालीसाठी आनंदाचा क्षण आहे याची जाणीव कवी राजेंद्र सोमवंशी यांनी आपल्या कवितेतून करून दिली.हे राष्ट्र माते आई जिजाऊ, लढायचं दादा लढायचं, मित्र वनव्या मध्ये गारव्यासारखा, आदी कवितांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.तसेच इयत्ता दहावी नंतर काय करावे यासाठी माजी प्राचार्य अशोक बस्ते यांनी मार्गदर्शन केले.शिक्षक मनोगत संदीप खिस्ते यांनी केले. इयत्ता १० च्या विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करतांना अश्रू अनावर झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. एन. धनगर यांनी केले तर सूत्रसंचालन साई मोरे, वेदांत बलक यांनी तर आभार प्रदर्शन वेदांत केदार याने केले
|
१९ फेब्रुवारी २०२५ शिवजयंती
|
|
|
के. के. वाघ विद्याभवन व ज्युनिअर कॉलेज भाऊसाहेबनगरच्या भव्य प्रांगणात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्याभवनाचे प्राचार्य यशवंत ढगे तर प्रमुख अतिथी उपमुख्याध्यापक दिवाकर शेजवळ, बस्तीराम रानडे, गणेश टर्ले, प्रवीण रणदिवे, राजेंद्र उगले उपस्थित होते.प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत ढगे यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांची गुणवैशिष्ट्ये विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच शिक्षक मनोगत व्यक्त करणारे राजेंद्र उगले यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग सांगितले.रेणुका गायकवाड,पीठे,साहिल वकटे, यांनी मनोगते व्यक्त केली. तर अतुल ढिकले आदी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया पवार, तर आभारप्रदर्शन गोविंद कांदळकर यांनी केले.
|
२२ फेब्रुवारी २०२५ चिंतन दिन
|
|
|
22 फेब्रुवारी 2025 स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज के. के. वाघ विद्याभवन व जुनियर कॉलेज, भाऊसाहेब नगर येथे चिंतन दिन साजरा करण्यात आला.
|
२७ फेब्रुवारी २०२५ 'मराठी राजभाषा गौरव दिन
|
|
|
|
|
के. के. वाघ विद्याभवन व ज्यु. कॉलेज, भाऊसाहेबनगर ता निफाड येथे 'मराठी राजभाषा गौरव दिन व विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडले. याप्रसंगी प्रमुख अतिथी विश्वस्त श्रीमती शकुंतलाताई वाघ, प्राचार्य यशवंत ढगे, उपमुख्याध्यापक दिवाकर शेजवळ यांचे हस्ते करण्यात आले. मराठी भाषेची गोडी वाढावी, मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, मनामनात मराठी भिनत जावी. यासाठी सुंदर हस्ताक्षर, निबंध, वक्तृत्व, काव्यवाचन, मराठी स्वाक्षरी या स्पर्धाचे आयोजन तीन गटात करण्यात आले होते. त्यात २२५ विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन ३९ विदयार्थ्यांना त्यानिमित्ताने पुस्तके व सन्मानपत्र बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी चंद्रकांत गंगावणे व प्राचार्य यशवंत ढगे यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी अनेक संत, श्रेष्ठ कवी, नाटककार यांचे योगदान महत्वाचे आहे. आपली मातृभाषा मराठी विषयी प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे. संतांनी आणि अनेक थोर कविंनी मातृभाषेसाठी दिलेलं योगदान, शिक्षणात मातृभाषा किती महत्वाची आहे. हे सांगितले. गायत्री आंबेकर यांनी 'पसायदानाचा मतितार्थ समजावून सांगितले. श्रीमती शकुंतलाताई वाघ यांनी सोपानदेव चौधरी लिखित 'मायबोलीचे माहेर' या कवितेचे गायन केले. व काही ओवी म्हटले.विद्यार्थी मनोगत, साई मोरे, यांनी मायबोली मराठी याविषयी माहिती सांगितली.तर अतुल ढिकले, पवन आहेर यांनी काव्य गायन केले. यावेळी सुंदर सूत्रसंचालन व बक्षीस यादी वाचन पूजा बोंबले यांनी केले तर आभार राजेंद्र उगले यांनी मानले. मराठी विभाग प्रमुख संजय धनगर यांनी प्रास्ताविक केले, ग्रंथापाल दीपक मोते यांनी वि. वा. शिरवाडकर यांचे साहित्य ग्रंथ प्रदर्शन भरून विदयार्थ्यांना समग्र साहित्य ओळख करून दिली.
|
२८ फेब्रुवारी २०२५ राष्ट्रीय विज्ञान दिन
|
|
|
|
|
के. के. वाघ विद्याभवन व ज्युनिअर कॉलेज भा. नगर येथे दि.२८ फेब्रुवारी २०२५रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून निफाड तालुका विज्ञान अध्यापक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती गीतांजली जाधव मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आदरणीय प्राचार्य श्री.यशवंत ढगे यांनी भूषविले.या प्रसंगी उपमुख्याध्यापक श्री. दिवाकर शेजवळ यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी विज्ञान चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात ११०विद्यार्ध्यानी सहभाग नोंदविला.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या हेतूने या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. चित्र प्रदर्शन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.याप्रसंगी विज्ञान विभाग प्रमुख श्रीमती गायत्री आंबेकर मॅडम यांनी ppt द्वारे रमण इफेक्ट विद्यार्थ्यांना साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितला. विज्ञान शिक्षिका श्रीमती प्रतीक्षा शेळके व श्रीमती किरण कदम यांनी प्रकाशाचे विकिरण हा सिध्दांत प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे सादर केला.प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ आदरणीय प्राचार्य श्री. यशवंत ढगे, प्रमुख अतिथी श्रीमती गीतांजली जाधव व उपमुख्याध्यापक श्री. दिवाकर शेजवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रतिमा पूजन करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी श्रीमती गीतांजली जाधव मॅडम यांनी विविध मनोरंजनात्मक प्रयोगांद्वारे महत्त्वाचे वैज्ञानिक सिध्दांत विद्यार्थी सहभागाद्वारे हसत खेळत स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य यशवंत ढगे जीवनातील विज्ञानाचे स्थान व महत्त्व यावर प्रकाश टाकला तसेच बक्षिसपात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून पेन व प्रमाणपत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्री. दिवाकर शेजवळ यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती शारदा मोरे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री.चंद्रकांत गंगावणे यांनी केले.
|