के. के. वाघ विद्याभवन व ज्युनियर कॉलेज, भाऊसाहेबनगर येथे ३ डिसेंबर २०२४ रोजी तारांगण - सफर अवकाशाची, हा शो आयोजित करण्यात आला.घुमटाकार बलून मध्ये त्रिमितीय प्रोजेक्टर च्या साहाय्याने अंतराळातील विविध गोष्टी याद्वारे दाखवण्यात आल्या.अवकाशातील आकाशगंगा, बुध शुक्र गुरू विविध ग्रह तारे याची माहिती दाखवण्यात आली.तसेच पृथ्वी, चंद्र सूर्य धूमकेतू याविषयीची अधिक माहिती व अवकाशातील विविध घटनांची माहिती देण्यात आली.या त्रिमितीय अनुभवा मुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अवकाशाची सफर केल्याचा अनुभव आला या शो दरम्यान के. के. वाघ विद्याभवन व ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य श्री अशोक बस्ते सर तसेच समन्वयक श्री यशवंत ढगे सर ज्युनियर कॉलेजचे ईन चार्ज श्री बस्तीराम रानडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना अवकाश दर्शन व महिती दिल्याबद्दल पालक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच याप्रसंगी विद्यालयाचे श्री ठाकरे सर, श्री पांडव सर,सौ. रत्नपारखी मॅडम, सौ. जाधव मॅडम, सौ. बिरारी मॅडम, श्री. रणदिवे सर, श्री मोरे सर, श्री. खैरनार सर, श्री.चव्हाण सर,श्री तिवारी सर, सौ सोनार मॅडम, श्री टर्ले सर, श्री पवार सर, श्री संगमनेरे सर, श्री गोरे सर, श्री स्वप्नील जाधव सर, आदी शिक्षक वृंद उपस्थित होता.
|
के. के. वाघ विद्याभवन,भाऊसाहेबनगर ता. निफाड येथे १६ डिसेंबर २०२४ रोजी इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी मराठी विषयातील पाठावर आधारित बालसभेचे आयोजन केले होते. प्राचार्य अशोक बस्ते व प्रा. यशवंत ढगे प्रमुख पाहुणे होते. बालसभा अध्यक्ष चि.प्रथमेश जाधव, तसेच ज्येष्ठ शिक्षक राजाराम गांगुर्डे, चंद्रकांत गंगावणे, बाजीराव वाघ,रत्ना शेंडगे,पूजा बोंबले,शारदा मोरे उपस्थित होत्या. चि.अथर्व शिंदे यांने सूत्रसंचालन केले, तर दुर्गेश खैरनार, साई उमप,यश बागले, आराध्य जाधव यांनी बालसभेविषयी मनोगत व्यक्त केले. वर्ग सजावट, वर्ग स्वच्छता,रांगोळी, फलक लेखन, स्टेज सजावट, निमंत्रण यात अनेक विद्यार्थी सहभागी झाले. आयुष नन्ने, गौरव आहेर, आदित्य बैरागी, हर्षद जाधव, राज वाघमारे, स्वराज बोळके,प्रथमेश आहेर, सार्थक साळे,रुद्र साळवे, ऋतिक पवार, अनिकेत पठाडे, वीर मत्सागर,रुद्र आहेर, कलश शेवकरआदी विद्यार्थ्यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले.हिमांशू नवसारे याने आभार मानले. उपक्रम यशस्वीतेसाठी विषय शिक्षक संजय धनगर यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य अशोक बस्ते,प्रा.यशवंत ढगे, बाजीराव वाघ, चंद्रकांत गंगावणे यांनी उपक्रम व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदनही केले.
|