के. के. वाघ विद्याभवन भाऊसाहेबनगर ता. निफाड येथे २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिन 'साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. यशवंत ढगे होते याप्रसंगी चंद्रकांत गंगावणे व संजय धनगर यांनी संविधान दिनाचे महत्व, संविधान समिती, भारतीय लोकशाही ही सर्व श्रेष्ठ लोकशाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानातील योगदान या विषयी मनोगत व्यक्त केले. तसेच एन. सी. सी. प्रमुख धनंजय मोरे यांनी भारतीय संविधानाचे वाचन केले सूत्रसंचालन क्रीडा प्रमुख गोविंद कांदळकर यांनी तर आभार बाजीराव वाघ यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
|