< Hurry Up For Admission! Admissions are Open for June 2026... < For online admission Google Form click here

PHOTO GALLARY

आरोग्य तपासणी महाशिबिर – भाऊसाहेबनगर | ८ फेब्रुवारी २०२६

भाऊसाहेबनगर येथे २६९५ ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी आदरणीय कै. बाळासाहेब (भाऊ) वाघ यांच्या पुण्यतिथी निमित्त तेरावे भव्य महाशिबीर उत्साहात संपन्न नाशिक- के के वाघ शिक्षण संस्था, नाशिक, के के वाघ फाऊंडेशन, श्री. बाळासाहेब वाघ वेल्फेअर फाऊंडेशन, स्माईल व स्पिनॅच यांचे संयुक्त विद्यमाने आदरणीय कै. बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेदरम्यान के के वाघ शैक्षणिक संकुल भाऊसाहेबनगर, ता.निफाड येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न झाले. यामध्ये नेत्र तपासणी- ८०७, हृदय तपासणी- ४७६, महिला कॅन्सर तपासणी-२२८, अस्थिविकार तपासणी- ३५८, फुफ्पुस व छाती तपासणी- २४९ कान-नाक- घसा तपासणी- २०९, दंत तपासणी- १०९, पोटविकार तपासणी- १०१, मेंदू विकार तपासणी- ८१, जनरल फिजिशीअन - ४३, किडनी विकार तपासणी-३४ अशा एकूण नागरिकांनी विविध तपासण्या केल्या. तसेच ८०७ नेत्र तपासणी रुग्नांपैकी २४१ रुग्नांना मोतीबिंदू निष्पन्न झालेला आहे. डॉ. प्राची पवार (नेत्र तपासणी तज्ज्ञ), डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी (हृदयविकार तज्ज्ञ), डॉ. ऐश्वर्या धर्माधिकारी (स्त्री रोग तज्ज्ञ) नामको हॉस्पिटल तर्फे स्त्रीविकार व स्तनाचा व गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर तपासणी, इंदोरवाला हॉस्पिटल तर्फे डॉ. सिमा वाघ, डॉ. सुप्रिया पापरीकर, कान-नाक-घसा तज्ज्ञ, डॉ. स्वनील साखला (फुफ्फुस /छाती तज्ज्ञ) , डॉ. अजिंक्य देसले (जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन व अस्थिविकार तज्ज्ञ), डॉ. राहुल नाईक (मेंदू व पाठीचा कणा विकार तज्ज्ञ), डॉ. निलेश तावडे (हृदयविकार तज्ज्ञ), डॉ. अक्षय कोर (हृदयविकार तज्ज्ञ), डॉ. अमेय पाटील (मूत्रसंस्था विकार तज्ज्ञ), डॉ.गौरव बोरगावकर (फुफ्फुस व छाती तज्ज्ञ), डॉ. कुणाल निकम(जनरल फिजिशिअन), डॉ. अभिजीत मोरे (किडनी विकार तज्ज्ञ), डॉ. सुदर्शन देशमुख व डॉ. योगेश गोसावी (पोटविकार तज्ज्ञ), डॉ. अमृता पाटील(स्त्री रोग तज्ज्ञ), डॉ. अमित बोरसे (दंतविकार तज्ज्ञ ) या नामांकीत डॉक्टरांनी रुग्नांची तपासणी केली. यावेळी भाऊसाहेब नगर, पिंपरी, रौळस, कुंदेवाडी, कारसुळ, वडाळी(नजीक), शिरसगाव, कोकणगाव, ओणे, कसबे-सुकेणे, मौजे सुकेणे, पिंपळस (रामाचे), कोठुरे या गावातील ग्रामस्थांनी तपासणी केली. शिबीर उद्धाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. समीर बाळासाहेब वाघ, विश्वस्त मा. शकुंतला बाळासाहेब वाघ, जनसंपर्क संचालक मा. अजिंक्य बाळासाहेब वाघ व सचिव प्रा. के. एस. बंदी, प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर, प्राचार्य पी. टी. कडवे, समन्वयक डॉ. बी. व्ही. कर्डिले, तानाजी पुरकर, बाळासाहेब जाधव, विष्णूपंत मत्सागर, सातभाई साहेब, पुंडलिक ताजणे, विलास बोरस्ते, डॉ.राहुल घायाळ, डॉ शरद आहेर व परीसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्राचार्य, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, रेक्टर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

News

कै.बाळासाहेब देवराम वाघ ९२ वी जयंती न्यूज २०२४

संयुक्त गुरूशिष्य पुण्यतिथी न्यूज सकाळ २३ जुलै २०२४

संयुक्त गुरूशिष्य पुण्यतिथी न्यूज सकाळ,देशदूत दिव्य भारती, लोकनामा २३ जुलै २०२४

दैनिक महाराष्ट्र भुषण न्यूज २७ जानेवारी २०२४

दैनिक महाराष्ट्र भुषण न्यूज १२ जानेवारी २०२४

लोकनामा १० जानेवारी २०२४

सकाळ २ जानेवारी २०२४

सकाळ ३० डिसेंबर २०२३

लोकनामा,सकाळ,देशदूत २९ डिसेंबर २०२३

पुढारी २८ डिसेंबर २०२३

देशदूत व सकाळ २८ डिसेंबर २०२३

दिव्य भारती लोकनामा महानगर पुढारी ८ फेब्रुवारी २०२२

सकाळ पुण्यनगरी ५ एप्रिल २०२१

सकाळ ५ नोव्हे.२०१९

पुण्यनगरी ५ नोव्हे.२०१९

गावकरी ५ नोव्हे.२०१९

देशदुत ५ नोव्हे.२०१९

सकाळ ४ नोव्हे.२०१९

महाराष्ट्र टाईम्स ४ नोव्हे.२०१९

दिव्य भारती ४ नोव्हे.२०१९

सकाळ २ नोव्हे.२०१९

सकाळ २ नोव्हे.२०१९

सकाळ २ नोव्हे.२०१९

देशदूत २ नोव्हे.२०१९

सस्नेह निमंत्रण स्मृतिगंध माजी विद्यार्थी मेळावा

बातमी माजी विद्यार्थी मेळावा

Download Application Form For Secondary School

Download Application Form for Jr. College